पवार-फडणवीस यांच्यात ४० मिनिटं बैठक


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार असून सरकार स्थापण्याच्या प्रक्रियेबाबत सर्व कागदपत्रे सादर करण्याचा आदेश न्यायालयाने महाधिवक्ता तुषार मेहता यांना दिला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जवळपास ४० मिनिटं दोघांमध्ये चर्चा सुरु होती.
दोघांमध्ये सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणी संदर्भात तसंच अजित पवारांच्या गटाला मंत्रीपदात मिळणारा वाटा या संदर्भात चर्चा झाली. भाजपाने मात्र ही बैठक फक्त बहुमत सिद्ध करण्यासंबंधी तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी संदर्भात होती अशी माहिती दिली. अजित पवारांच्या पाठिंब्याने भाजपा बहुमत सिद्ध करु शकलं आणि सरकार स्थापना झाली तर अजित पवार यांच्या गटाला १२ मंत्रीपदं आणि १५ महामंडळं दिली जाऊ शकतात.

Post a Comment

Previous Post Next Post