आरे कारशेडला स्थगिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. पुढचा विचार केला जाईल तोपर्यंत आरे कारशेडमधलं एक पानही तोडता येणार नाही. रातोरात झाडांची कत्तल मंजूर नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
विधीमंडळ पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. ठाकरे कुटुंबाने स्वतःसाठी काहीही केलं नाही हे सगळ्या पत्रकारांना माहित आहे. महागाई, भ्रष्टाचार, टंचाई या सगळ्याचा सामना आम्हाला करायचा आहे. मी न सांगता मुख्यमंत्री झालो आहे. मी मुख्यमंत्री म्हणून येईन असं काही सांगितलं नव्हतं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

मंत्रालयातल्या परंपरा, प्रथा मला ठाऊक नाहीत. तरीही हे शिवधनुष्य उचललं आहे. कराच्या रुपाने येणारा पैसा आपण कसा खर्च करतो? याचं उत्तर जनतेला द्यायचं आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post