मुख्यमंत्री शिवसेनेचाच हीच ठाम भूमिका : राऊत


एएमसी मिरर : वेब न्यूज
उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे. जो निर्णय महाराष्ट्राच्या हितासाठी योग्य असेल तो निर्णय उद्धव ठाकरे घेतील. राज्याचं नेतृत्त्व शिवसेनेचा मुख्यमंत्रीच करेल. उद्धव ठाकरे जी भूमिका मांडत आहेत ती हीच आहे. युती तोडण्याचं पाप उद्धव ठाकरे करणार नाहीत, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
मतदार वाट बघत आहेत की शिवसेनेचा मुख्यमंत्री कधी होईल? आमच्याकडे भाजपाला वगळून पर्याय तयार आहे आणि संख्याबळही तयार आहे. भाजपकडे संख्याबळ नसल्यामुळेच ते सत्तास्थापनेचा दावा करत नाहीत. ज्या गोष्टी ठरल्या आहेत, त्यापेक्षा जास्त मला काहीही नको, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे, असे सांगत भाजपाने आता सत्तेची हाव सोडून द्यावी, अशी टिपण्णीही संजय राऊत यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post