सर्व काही शिवसेनेच्या भूमिकेवर अवलंबून : अशोक चव्हाण


एएमसी मिरर : वेब न्यूज

जनतेने भाजपाच्या बाजूने कौल दिलेला नाही, त्यामुळे भाजापाचे सरकार राज्यात येता कामा नये हा त्यातील प्रमुख निष्कर्ष आहे. सध्या जे काही पर्याय समोर आहेत, त्यावर विचार करूनच निर्णय घेतला जाईल. मात्र, शिवसेना काय भूमिका घेते हे महत्वाचे ठरणार आहे. शेवटी शिवसेनेने निर्णय घेतल्यानंतरच राज्यात सत्ता परिवर्तन होऊ शकतं, ही आजची वस्तूस्थिती आहे. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेते यावर बरच काही अवलंबून आहे, असे मत कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
भाजपाने महायुतीमधील सहकारी पक्षांना विश्वासात न घेतल्यामुळे राज्यात आज ही परिस्थिती ओढावली आहे. यामुळे शिवसेना अस्वस्थ झाली व त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जोपर्यंत शिवसेना युतीतून बाहेर पडत नाही, तोपर्यंत यावर तोडगा निघणार नाही, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post