विश्वजीत कदम यांच्या कारचा भीषण अपघात


एएमसी मिरर : वेब न्यूज
काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि आमदार विश्वजीत कदम यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. पुण्यात रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने विश्वजीत कदम यांना कोणतीही इजा झाली नसून, ते थोडक्यात बचावले आहेत. एअर बॅगमुळे विश्वजीत कदम यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र गाडीचं खूप मोठं नुकसान झालं आहे.
विश्वजीत कदम रात्री कराडच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. कराडमध्ये आयोजित कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर काही वेळाने विश्वजीत कदम कराडच्या दिशेने रवाना झाले.

Post a Comment

Previous Post Next Post