शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार : विजय वडेट्टीवार


एएमसी मिरर : वेब न्यूज
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट केले आहे. विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यात असल्याचं स्पष्ट केलं असून पहिल्या कार्यकाळात मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असावं अशी चर्चा असल्याची माहिती दिली आहे.

शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांचं सत्र अद्यापही सुरु आहे. नवी दिल्लीत सकाळपासून काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरु असून यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासमोर एकसुत्री कार्यक्रम मांडण्यात आला. अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नसीम खान, नितीन राऊत, मल्लिकार्जुन खरगे, सी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक सुरु आहे.
बैठकीत ५०-५० फॉर्म्युलावर चर्चा सुरु असून कोणाकडे किती कालावधी असावा यावर चर्चा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post