उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार न स्विकारताच अजित पवार परतले


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊनही आज पदभार न स्विकारल्याने तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्विकारत कामकाज करण्यास सुरुवात केली असून, अजित पवार मात्र पदभार न स्विकारताच घऱी माघारी फिरले.
दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्विकारत नव्या कार्यकाळातील पहिल्या आदेशावर सोमवारी सही केली. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या धनादेशावर त्यांनी ही सही केली. हा सही केलेला धनादेश त्यांनी दादरच्या कुसूम वेंगुर्लेकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post