शिवसेनेसोबतचा तिढा लवकरच सुटेल : नितीन गडकरी


एएमसी मिरर : वेब न्यूज
भाजपा शिवसेना युतीला महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे सरकार महायुतीचंच येणार हे उघड आहे. शिवसेनेशी चर्चा सुरु आहे. दोन्ही पक्षांमधला तिढा लवकरात लवकर सुटेल, अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री भाजपाचाच होईल, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपा आणि शिवसेना यांच्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणूक निकाल लागून १३ दिवस उलटून गेले आहेत, तरीही सरकार स्थापन करण्यात आलेलं नाही. शिवसेनेकडून रोजच मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल अशी घोषणा केली जाते आहे. हा सगळा पेच निर्माण झालेला असताना नितीन गडकरींनी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच विराजमान होतील, ऐसे स्पष्ट करून दोन्ही पक्षांमधला तिढा लवकरात लवकर सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post