तर फडणवीस व पवारांनी राजीनामा दिला नसता : आठवले


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आज सायंकाळी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्याबरोबर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोनजण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठले यांची एक प्रतिक्रिया समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जर बहुमत सिद्ध करण्यासाठी २४ तास एवढा कमी कालावधी दिला नसता तर, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा दिला नसता, असे त्यांनी म्हटले आहे.
”भाजपा देखील बहुमत दाखवून सत्ता स्थापन करू शकली असती. सर्वोच्च न्यायालयाने जर बहुमत सिद्ध करण्यासाठी २४ तासांची मुदत दिली नसती, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा दिला नसता. चोवीस तासांच्या कमी कालावधीत बहुमत सिद्ध करणे कठीण होते.” असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post