नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले ५,३८० कोटी


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपातकालीन निधीतून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५,३८० कोटी रुपये मंजूर केले आहेत. सीएमओच्या टिे्वटर अकाउंटवरुन मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.
अजित पवारांनी काल रात्री वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत देण्यासाठी आणखी काय करता येऊ शकते यावर चर्चा झाली होती.

Post a Comment

Previous Post Next Post