डॉ. प्रकाश आमटेंचा बिल गेट्स यांच्या हस्ते होणार गौरव


एएमसी मिरर : वेब न्यूज 
डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना लाईफटाईम अचिव्हमेंट मेडलनं गौरवण्यात येणार आहे. रविवारी (१७ नोव्हेंबर) नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते त्यांचा गौरव केला जाणार आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य सेवेमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना गौरवण्यात येणार आहे. यात डॉ. प्रकाश आमटे, डॉ. सायरस पूनावाला, डॉ. किरण मझूमदार-शॉ यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
यापूर्वी आमटे दाम्पत्याला मॅगेसेसे पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. गडचिरोलीतील लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून ते आरोग्य सेवा देत आहेत. लोक बिरादरी प्रकल्पामार्फत आदिवासी लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी भरीव कार्य केले असून त्यासाठी स्वत:चे संपूर्ण आयुष्य त्यांनी समर्पित केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post