मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारचा उद्या शपथविधी पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईत आघाडीची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व मुद्द्यांवर अंतिम चर्चा झाली असल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार, या सरकारमध्ये एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसचा उपमुख्यमंत्री असेल तर विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचा आणि उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पटेल म्हणाले की, उद्या होणाऱ्या शपथविधीच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी, मंत्रीमंडळ आणि इतर संबंधीत विषयांवर चर्चा करण्यासाठी उद्ध ठाकरे, शरद पवार, अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे आणि तिन्ही पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत तिन्ही पक्षांचे मंत्रीमंडळात किती सदस्य असतील तसेच येणाऱ्या काळात महामंडळं, विधानपरिषद यांवर ज्या नियुक्त्या होतील या सर्व बाबींवर अंतिम चर्चा पूर्ण झाल्या आहेत.
उद्या होणाऱ्या शपथविधीप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह आघाडीतील तिनही पक्षांचे एक किंवा दोन मंत्री शपथ घेतील. त्यानंतर ३० नोव्हेंबरपर्यंत विश्वासदर्शक ठरावासाठी राज्यपालांनी मुदत दिली आहे. या मुदतीत याची प्रक्रियाही पार पाडली जाईल. पुढे ३ डिसेंबरनंतर उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार हाईल, असेही यावेळी पटेल यांनी स्पष्ट केले.

Post a Comment