उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना निमंत्रण


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : उद्या (गुरुवार) उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेनेसह महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू आहे. देशभरातील सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांबरोबरच राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील ४०० शेतकऱ्याना तसेच, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांचा उद्या शिवाजी पार्क मैदानावर शपथविधी होणार आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post