योग्य वेळ आल्यावर अजित दादांबद्दल बोलेन : देवेंद्र फडणवीस


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : योग्य वेळ आल्यावर अजित दादांबद्दल बोलेन, असं सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. अजित पवार यांच्याबद्दर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
तीन दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या पाठिंब्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु नंतर अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर बहुमत सिद्ध होणार नसल्यानं देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
अजित पवारांचा राजीनामा आल्याने आमच्याकडेही बहुमत उरलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आमच्यासोबत आल्याने आम्ही सत्ता स्थापन केली होती. आता अजित पवारच आमच्यासोबत नाहीत त्यामुळे आमच्याकडे बहुमत नाही. आम्ही आमदार फोडणार नाही. ही पत्रकार परिषद झाल्यावर मी राज्यपालांना भेटून राजीनामा देणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जाहीर केलं होतं. त्यानुसार त्यांनी मंगळवारी राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सादर केला होता.

Post a Comment

Previous Post Next Post