भिशी कंपनीकडुन 54 लाखांची फसवणूक


एएमसी मिरर : नगर
भिशी कंपनीकडुन ग्राहकांना गुंतवणुक व व्याजाचे अमिष दाखवुन सुमारे 54 लाखांची फसवणुक केल्याची घटना नगरमधील डौले हॉस्पिटलशेजारील आदेश प्लाझा येथे 30 जानेवारी 2015 ते 5 जुलै 2019 च्या दरम्यान घडली.
चंद्रकांत आनंदा गवळी (वय 50, रा. वाकोडी फाटा) यांनी 25 लाख रुपये, मोहन नाथा दुसुंगे (रा. नेहरू चौक, भिंगार) यांनी 5 लाख रुपये, किशोरकुमार रामपाल प्रजापती (रा.भिस्तबाग चौक) यांनी 8 लाख 90 हजार रुपये, अनिल श्रीमल पितळे (नवीपेठ) यांनी 7 नाख रुपये, रामचंद्र दशरथ बिडवे (रा. शुक्लेश्‍वर कॉलनी, भिंगार) यांनी 7 लाख 50 हजार रुपयांची अशी एकुण 53 लाख 40 हजार रुपयांची गुंतवणूक केली. 2015 पासुन मॅक्सकेअर क्युरीज इंडिया प्रा.लि. या भिशीच्या (चिट फंड) कंपनीमध्ये वेळोवेळी गुंतवणुक केली. त्याचा मोठा परतावा मिळणार होता. मात्र कंपनीने त्यांना व्याजासह मिळणारा परतावा न देता त्यांची फसवणुक केली.
याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी चंद्रकांत गवळी यांच्या फिर्यादीवरून सचिन कारभारी सांळुके (रा. आदेश प्लाझा, डौले हॉस्पिटल शेजारी) व युवराज सोपान रणसिंग (रा. 10/04/02, दगडु पाटील नगर, शेरगाव, पुणे) यांच्या विरूध्द भादंविक 420, 406, 34 प्रमाणे फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post