शिवसेना सत्तास्थापन करणार असेल तर भाजप विरोधात बसणार?


एएमसी मिरर : वेब न्यूज 
राज्यात सत्तास्थापनेबद्दल भाजपची कोअर कमिटीची बैठक आज पार पडली. शिवसेना सरकार स्थापन करत असेल तर भाजप विरोधी पक्षात बसणार असल्याचं ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहेत.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अपक्षांची काही जुळवाजुळव होते का यासंदर्भात चर्चा झाली. कोअर कमिटीच्या बैठकीनंतर अमित शाह यांच्याशी संपर्क साधून सर्व माहिती त्यांना देण्यात आली. भाजपची सध्याची स्थिती पाहता अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन होणे शक्य नाही. त्यामुळे शिवसेना सरकार बनवत असेल, तर भाजपची विरोधी पक्षात बसायची मानसिकता झाली आहे. दुपारी 4 वाजताच्या बैठकीत या सगळ्या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
राज्यपालांनी भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. महाराष्ट्रातील 105 आमदार असलेला पक्ष म्हणून राज्यपालांनी आम्हाला निमंत्रण दिलं. कोअर कमिटीच्या बैठकीत निमंत्रणाच्या संदर्भात चर्चा झाली. पुन्हा दुपारी 4 वाजता बैठक घेणार आहोत आणि बैठकीनंतर राज्यपालांना आपला निर्णय कळवणार आहोत, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना दिली.

Post a Comment

Previous Post Next Post