राजीनाम्यापूर्वी ट्रायडंटमध्ये दोन्ही पवारांची गुप्त बैठक?


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये मंगळवारी सकाळीच मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये एक महत्वाची व गुप्त बैठक झाली. या बैठकीनंतर फडणवीस सरकार फारकाळ टिकणार नाही, हे स्पष्ट झाले होते, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक झाली त्यावेळी तिथे खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतल्यास योग्य तो सन्मान राखू, असा शब्द या बैठकीत अजित पवारांना दिल्याची माहिती आहे.
शरद पवारांनी या बैठकीत अजित पवारांना बुधवारी विधानसभेत होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी अनुपस्थित राहा किंवा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दे, असे सांगितल्याची माहिती सांगितली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post