भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा करुन सरकार बनवले पाहिजे : संजय राऊत


एएमसी मिरर : वेब न्यूज
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार उद्या राज्यापालांची भेट घेणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपा सरकार स्थापनेचा दावा करणार असेल तर ती चांगली गोष्ट आहे असे म्हटले आहे. मोठा पक्ष म्हणून भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा करुन सरकार बनवले पाहिजे. राज्यपालांना ते १४५ आमदारांच्या पाठिंब्याची यादी देणार असतील तर ती आनंदाची बाब आहे असे राऊत म्हणाले.
त्याचवेळी संजय राऊत यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा दावा केला. सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्राला लवकरच गोड बातमी मिळेल असे म्हणाले होते. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार ही ती गोड बातमी आहे असे राऊत म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post