राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात जाणार

एएमसी मिरर : वेब न्यूज
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात निर्णय झाला तर उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात जाणार अशी माहिती आता समोर आली आहे. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात अहमद पटेल आणि कपिल सिब्बल यांच्याशीही चर्चा केली.
महाराष्ट्रात सत्था स्थापनेचा अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेने जो दावा केला होता त्याची मुदत संपली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी बोलवण्यात आलं आहे. राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचा दावा सिद्ध करता आला नाही तर राष्ट्रपती राजवट लागू शकते. असं झाल्यास उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post