इन्फोसिसमध्येही कपात; वरिष्ठ अधिकाऱ्यांची गच्छंती


एएमसी मिरर : वेब न्यूज
आयटी क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या कॉग्निझंटने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्यानंतर आता इन्फोसिसनेही त्याच दिशेने पाऊल टाकले आहे. इन्फोसिस मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. कॉग्निझंटने कर्मचारी कपातीसाठी जो मार्ग अवलंबला आहे तशाच प्रकारे इन्फोसिसही कपात करणार आहे. वरिष्ठ आणि मधल्या पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनी कामावरून काढणार आहे. यानुसार इन्फोसिस १० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.
कर्मचारी कपातीत इन्फोसिसमधील किमान २२०० कर्मचाऱ्यांना काढण्यात येणार आहे. यात जॉब लेव्हल 6 (JL6)मधल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. इन्फोसिसमध्ये JL6, JL7 आणि JL8 मधील श्रेणीत एकूण ३०, ०९२ कर्मचारी आहेत. यासोबत इन्फोसिस JL3 आणि त्या खालील पदांवर काम करणाऱ्या २ ते ५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलीय. यानुसार JL3 आणि त्या खालील पदांवरील किमान १० हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे. इन्फोसिसमध्ये ८६, ५५८ कर्मचारी आहेत. इन्फोसिसमध्ये एकूण १.१ लाख कर्मचारी आहेत.
इन्फोसिसच्या वरिष्ठ पदांवर ९७१ अधिकारी आहेत. असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट, व्हाइस प्रेसिडेंट, एग्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट यासारख्या वरिष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांनाही इन्फोसिस कामावरून काढणार आहे. या वरिष्ठ पदांवरील किमान ५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाणार आहे.

इन्फोसिसमधील कर्मचारी कपात ही अतिशय स्पष्टपणे आणि लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून केली जाईल. यापूर्वी कंपनीने कामगिरीच्या आधारावर कपात केली होती. पण यावेळी हाही विचार करण्यात येणार नाही. यामुळे अधिक कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. सध्या आयटी उद्योगाला वैशिष्ट्यपूर्ण कर्मचाऱ्यांची गरज आहे. बहुतेक काम आता ऑटोमेशनवर होत असल्याने पारंपरिक सेवांसाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता नाहीए, असं अमेरिकेतील आयटी क्षेत्रातील जाणकारांनी म्हटलंय.

Post a Comment

Previous Post Next Post