एएमसी मिरर : वेब न्यूज 
कर्नाटक विधानसभेच्या 15 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. कर्नाटकचे मुख्य निवडणूक आयुक्त संजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. विधानसभेच्या या 15 जागांसाठी 5 डिसेंबर रोजी मतदान तर 9 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती कुमार यांनी दिली. पोटनिवडणुकीसाठी 11 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार असून 18 नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे.
दरम्यान, काँग्रेस-जेडीएसच्या 17 आमदारांनी कुमारस्वामी सरकारविरोधात बंड पुकारत कर्नाटकात भाजप सरकार येण्यास मदत केली होती. विश्वासदर्शक ठरावा वेळी व्हीप नाकारणाऱ्या या आमदारांना विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरवल्यामुळे या बंडखोरांना 2023 पर्यंत विधानसभेची पोटनिवडणूक लढविता येणार नाही. यासंदर्भात अपात्र आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत 14 बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्यात आले. याच रिक्त जागांवर आता पोटनिवडणुका होणार आहेत.