उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांची जालन्यातून सुटका


एएमसी मिरर : नगर
प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांना पिस्तुलाचा धाक दाखवून सिनेस्टाईलने त्यांच्या राहात्या घराजवळून ‘किडनॅप’ करण्यात आले होते.  या घटनेमुळे नगर शहरासह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली. हुंडेकरी यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. मात्र, अपहरणकर्त्यांनीच जालन्यात त्यांना सोडून दिले. दुपारी उशिरा त्यांनी नगरमध्ये आणण्यात आले.
सोमवारी सकाळी चार ते पाच जणांच्या गुंडानी पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांना एका लाल रंगाच्या कारमध्ये बसविले. त्यानंतर ती गाडी वेगाने निघून गेली. अपहरण करणार्‍या गुंडांनी चेहर्‍यावर मास्क बांधले होते. ही घटना एका महिलेने पाहिली होती. गुंडाच्या तावडीतून हुंडेकरी सोडविण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांना यश आले नाही. या सगळा प्रकार सीसीटीव्हीच्या कॅमेर्‍यात झाला. या घटनेची माहिती मिळताच हुंडेकरी यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली. हुंडेकरी यांच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्ह्यासह राज्यातील पोलिसांना अलर्ट देवून सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली होती. मात्र, अपहरणकर्त्यांनीच हुंडेकरी यांना सोडून दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आरोपींचा तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post