अजित पवार म्हणजे धोबी के पप्पू; केआरकेने उडवली खिल्ली


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : मंगळवारी अजित पवार यांनी आधी उपमुख्यमंत्रिपदाचा व त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. सध्या राज्यात सुरु असलेल्या या घडामोडींवर बॉलिवूड अभिनेता कमाल आर खानने (केआरके) त्याची प्रतिक्रिया देत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
कमाल खानने ट्विटरद्वारे त्याचे मत व्यक्त करत ‘आज अजित पवार धोबी के पप्पू बन गए है, ना घर के रहे ना घाट के’ असे म्हटले आहे. त्याचे हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. या ट्विट पाठोपाठ कमालने आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. केआरकेचे हे दोन्ही ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post