अजित पवारांना मी शेवटचं भेटून समजवणार : जयंत पाटील


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : अजित पवार यांना मी शेवटचं भेटून समजवणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
महाविकासआघाडीने राज्यपालांकडे 162 आमदारांचं सह्या असणारं पत्रं राजभवनात दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधाला त्यावेळी पाटील बोलत होते.
अजित पवारांनी बंड पुकारल्यानंतर त्यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादी गेल्या 2 दिवसांपासून प्रयत्न करत आहे. आजही राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, रामराजे निंबाळकर आणि दिलीप वळसे-पाटील हे अजित पवारांशी चर्चा करत आहे. विधीमंडळ गटनेते पदावरुन राष्ट्रवादीने अजित पवारांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. मात्र पक्षामधून काढून टाकलेले नाही. त्यामुळं अजूनही राष्ट्रवादीकडून अजित पवारांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर जंयत पाटील हेही अजित पवारांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. मी अजित पवारांना आज शेवटचं समजावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post