महाविकास आघाडीची पागलपंती : शेलार


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : राज्यपालांना महाविकास आघाडीने दिलेलं पत्र म्हणजे तीन पक्षांची पागलपंती आहे, असा टोला भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे.
आज महाविकास आघाडीने राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचं पत्र दिलं. मात्र यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट केलेलं नाही. विधीमंडळाचे नेते म्हणून जयंत पाटील यांनी सही केली आहे. मात्र त्यांना सही करण्याचा अधिकार नाही. कारण अजित पवार हेच विधीमंडळ नेते आहेत. काँग्रेसने अद्याप त्यांचा नेताच निवडलेला नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर ही महाविकास आघाडीची पागलपंती आहे यात शंकाच नाही, असं आशिष शेलार यांनी म्हटले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post