शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांची लागणार मंत्रिमंडळात वर्णी?


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या (२८ नोव्हेंबर) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात कोण असेल, अशी चर्चा सुरू झाली असून, तिन्ही पक्षातील काही नेत्यांची नावे आघाडीवर आहेत.
महाविकास आघाडीचं मंत्रिपदाच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहेत. शिवसेनेला १६ मंत्रिपद, राष्ट्रवादीला १४ आणि काँग्रेसला १२ मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात नेमका कुणाचा समावेश होणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

तिन्ही पक्षातील ‘हे’ नेते आहेत स्पर्धेत

शिवसेना :

एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील.

राष्ट्रवादी :
धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील, मकरंद पाटील आणि राजेश टोपे.

काँग्रेस :

अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, के.सी. पडवी, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, सतेज पाटील आणि सुनील केदार.

Post a Comment

Previous Post Next Post