सत्ता स्थापनेचा पेच सुटण्याच्या मार्गावर; आज घोषणा शक्य


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नव्या ‘महाविकासआघाडी’नं सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. आज (शुक्रवारी) मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक होणार आहे. त्यानंतर ‘महाविकासआघाडी’ विषयी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
सत्तावाटपात पूर्ण पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अशी तडजोड झाल्याचे बोलले जात आहे. आजच्या बैठकीनंतर शनिवारी ‘महाविकासआघाडी’चे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, सत्तास्थापनेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात गुरूवारी रात्री उशिरा बैठक झाली. यामध्ये ‘महाविकासआघाडी’ बाबत निर्णय जवळपास निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे. आज होणाऱ्या नियोजित बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत हेदेखील उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post