ही दिल्लीतल्या नेत्यांना चपराक; काँग्रेसची प्रतिक्रिया


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार असत्याच्या पायावर उभे होते. त्यामुळे ते पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. दोघांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेच काँग्रेसकडून ही प्रतिक्रिया देण्यात आली.
“हा फक्त देवेंद्र फडणवीस यांचा पराभव नाही, तर दिल्लीत बसलेल्या त्यांच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर चपराक आहे” असे काँग्रेसने म्हटले आहे. लोकांनी दिलेल्या जनादेशाचे अपहरण करणारे आज उघडे पडले आहेत, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post