भाजप कार्यालयाबाहेर सन्नाटा, शिवालयाबाहेर जल्लोष


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : महाराष्ट्रात शनिवारी गुपचूप सत्तेत आलेले भाजप सरकार बुधवारी कोसळले. अवघ्या ७८ तासांच्या आत भाजपला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. अजित पवार यांनी उपमुख्यंमत्रीपदाचा, तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे 72 तासांपूर्वी जल्लोष साजरा होणाऱ्या मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर सन्नाटा दिसून आला, तर शिवालयाबाहेर शिवसैनिकांनी तुफान जल्लोष केला.
महाराष्ट्रात शनिवारी मोठा राजकीय उलटफेर झाला. सकाळी 7:30 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु अजित पवार यांनी बुधवारी दुपारी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर काही वेळाने देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला. त्यामुळे 72 तासांपूर्वी जल्लोषात असणाऱ्या भाजप कार्यालयाबाहेर स्मशान शांतात पसरली, तर शिवालयाबाहेर शिवसैनिकांनी जल्लोष केला.

Post a Comment

Previous Post Next Post