विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सहा ज्येष्ठ आमदारांची नावं राज्यपालांकडे


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : विधीमंडळ सचिवालयांच्या कार्यालयाने विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी सहा ज्येष्ठ आमदारांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यालयाला पाठवली आहे. यापैकी एकाच आमदाराची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड केली जाणार आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.
या यादीमध्ये भाजपच्या तीन, काँग्रेसच्या दोन आणि राष्ट्रवादीच्या एका आमदारांचा समावेश करण्यात आली आहे. दरम्यान या यादीत शिवसेनेच्या एकाही आमदाराचे नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विधीमंडळ सचिवालयाने पाठवलेल्या यादीतीन सहा आमदारांची नावं
1) राधाकृष्ण विखे पाटील - भाजप
2) कालिदास कोळंबकर - भाजप
3) बबनराव पाचपुते - भाजप
4) बाळासाहेब थोरात - काँग्रेस
5) के. सी. पाडवी - काँग्रेस
6) दिलीप वळसे पाटील - राष्ट्रवादी

Post a Comment

Previous Post Next Post