महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना; उध्दव ठाकरे करणार नेतृत्व


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी कोंग्रेसने एकत्र येवून 'महाराष्ट्र विकास आघाडी'ची घोषणा केली आहे. हॉटेल ट्रायडेंट मध्ये बैठकीत हां निर्णय झाला. दरम्यान, आघाडीचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे करणार आहेत. आघाडीच्यावतीने उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 'महाराष्ट्र विकास आघाडी'चा प्रस्ताव मांडला. जयंत पाटील यांनी आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची सूचना मांडली. बाळासाहेब थोरात यांनी त्याला अनुमोदन दिले. सर्वांच्या सहमतीने ठाकरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होऊन त्यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार घोषित करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post