50-50 काय आहे? काय एखादं बिस्किट आहे का?


एएमसी मिरर : वेब न्यूज
सत्तास्थापनेवरुन एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युल्याची शिवसेनेकडून भाजपाला सतत  आठवण करुन दिली जात असून 50-50 फॉर्म्युला स्वीकारण्याची मागणी केली जातेय. यावरुन, हे 50-50 काय आहे? काय एखादं बिस्किट आहे का? असा टोला ओवेसी यांनी लगावला आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, “हे 50-50 काय आहे? काय एखादं नवं बिस्किट आहे का? किती 50-50 करणार ? काहीतरी महाराष्ट्राच्या जनतेसाठीही ठेवा. त्यांना साताऱ्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची चिंता नाहीये. ते सगळे 50-50 च्या बाता मारतायेत. हा कोणत्या प्रकारचा ‘सबका साथ सबका विकास’ आहे? असा सवालही ओवेसी यांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post