ओवेसींचे वादग्रस्त ट्विट; नेटकऱ्यांकडून झाले ट्रोल


एएमसी मिरर : वेब न्यूज 
अयोध्या प्रकरणाचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला. वादग्रस्त जागी राम मंदिर होईल, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. तर मशिदीसाठी पर्यायी पाच एकरची जागा देण्याचाही निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. आता खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी याबाबत एक ट्विट करत 'मला माझी मशीद परत हवी', असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या ट्विट नंतर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे.
काही ट्विटर यूजर्सनी ओवेसींना थेट १६ व्या शतकात जा असं ठणकावलं आहे. आत्ताचा भारत हा मोगलाईच्या काळातील भारत नाही, असंही सुनावलं आहे. तर याच प्रतिक्रियेवर एकाने प्रतिक्रिया देत ओवेसींना जास्त मागे पाठवू नका, कारण १२ व्या शतकात वगैरे पाठवलंत, तर तिथे राम मंदिरच मिळेल, असा खोचक टोला लगावला आहे. अयोध्येतील राम मंदिर प्रकरणी जेव्हा सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिला त्यानंतरही ओवेसी यांची एक प्रतिक्रिया समोर आली होती. “बाबरी मशीद बेकायदा होती तर ती पाडल्याबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींवर गुन्हा का दाखल करण्यात आला? आणि ती कायदेशीर होती तर मग ती अडवाणींच्या हिंदुत्ववादी पक्षकारांना का दिली?,” असा सवाल एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला होता. आता पुन्हा एकदा 'मला माझी मशीद परत हवी' असे ट्विट त्यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post