'तर शेतकरीप्रश्नी राज्यपालांच्या निवासस्थानावर मोर्चा काढू'


एएमसी मिरर : वेब न्यूज
अवकाळी पावसाने राज्यात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याकडे राज्यपालांनी गांर्भीयाने बघितले पाहिजे. अन्यथा राज्यपालाच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगीतले आहे. या बाबतीत मातोश्रीवर जाऊन चर्चा केली असल्याचे बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगीतले.
सरकार स्थापन होईल तेव्हा होईल, पण अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला पहिल्यांदा मदत करणे गरजेचे आहे. तसेच राज्यातील सत्ता स्थापनेच्या भानगडीत मला पडायचे नाही. सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्याएवढा मी मोठा नसल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या शेतकरी अडचणीत आहे. यासाठी राज्यपालांनी पुढाकार घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा. सरकार कोणाचे बनेल त्यावेळी बनेल, पण शेतकरी बचावला पाहिजे. राज्यपालांनी लवकर निर्णय घेतला नसल्यास आम्हाला राज्यपालांच्या दारात आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post