शिवसेनेत लवकरच मोठा भूकंप : आमदार राणा


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : आगामी काळात शिवसेनेत मोठा भूकंप होणार आहे तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार देखील आमच्या बरोबर येणार असल्याचा दावा, युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी केला आहे.
सध्या राज्यात सुरू असलेल्या वेगवाग घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना आमदार राणा यांनी सांगितले की, मी उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांचे अभिनंदन केले आहे. थोडा वेळ लागला परंतु राज्याला आता चांगले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळालेले आहेत.आगामी काळात शिवसेनेत मोठा भूकंप, मोठी उलटपुलट होणार आहे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार देखील आमच्या बरोबर येणार आहेत.
याचबरोबर भाजपा सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या १७५ पेक्षाही जास्त होणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. आम्ही यादी तयार केलेली असून त्यातून हा आकडा आला आहे. शिवसेनेत सध्या घडत असलेल्या घडामोडींमुळे हे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post