बुलेट ट्रेन आणि नाणार सारख्या प्रकल्पांना आपला विरोध कायम : राजू पाटील


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : मनसेने महाविकास आघाडीबद्दल अद्याप कोणतीही भूमिका घेतली नव्हती. परंतु आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्याचं प्रश्न आपण विधीमंडळात मांडणार आहोत. तसंच बुलेट ट्रेन आणि नाणार सारख्या प्रकल्पांना आपला विरोध कायम राहिल, असंही त्यांनी बोलताना सांगितलं.
आता महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार आहे. त्यात मनसेला स्थान मिळेल का असा सवाल राजू पाटील यांना करण्यात आला. त्यावर उत्तर देताना याचा निर्णय राज ठाकरे घेतील, असंही ते म्हणाले. दरम्यान, निवडणुकीपूर्वी मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसनं काही ठिकाणी मनसेला मदत केली होती. परंतु मनसेला त्या ठिकाणी यश मिळालं नव्हतं. परंतु आता मनसे महाआघाडीबाबत काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल.

Post a Comment

Previous Post Next Post