हॉटेलमध्ये फक्त 130 आमदार : नारायण राणे


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : ग्रँड हयात हॉटेलमध्ये फक्त 130 आमदार होते, असा दावा आता भाजपा नेते नारायण राणे यांनी केला. त्यांच्या हातात आमदारच नाहीत. ग्रँड हयात या हॉटेलमध्ये 160 आमदार नव्हते. तर 130 आमदारच उपस्थित होते. जे आमदार आले नाहीत, त्यातला सगळ्यात मोठा खड्डा शिवसेनेला पडला आहे. अनेक आमदार विधान परिषदेचे होते, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. 
एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी हा दावा केला. शिवसेनेचे सर्वाधिक आमदार फुटले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. शपथ घेतल्याने काय होणार आहे? मातोश्रीवर रोज शपथ घेतली जाते त्याचा काय उपयोग? जे आमदार उपस्थित होते, त्यांच्यापैकीही किती प्रामाणिक आहेत? हा प्रश्न माझ्या मनात आहे, असेही ते म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांनी नारायण राणे यांचा दावा खोडून काढला. काही लोकांना क्षणिक आनंद घ्यायचा असेल, तर घेऊ देत. नारायण राणेंचा सल्ला भाजपाने घेतला असता तर, भाजपाचं नुकसान झालं नसतं, असा टोला आव्हाड यांनी लगावला.

Post a Comment

Previous Post Next Post