..तर मी स्वत:चं घरदेखील पेटवू शकते : नवनीत राणा


एएमसी मिरर : वेब न्यूज
युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी ओला दुष्काळ आणि शेतकरी प्रश्नावरुन शिवसेनेवर निशाणा साधला असून जोरदार टीका केली आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस असून यावेळी लोकसभेत बोलताना नवनीत राणा यांनी शिवसेनेमुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्याचा आरोप केला. तसंच शेतकऱ्यांना मदत करण्याची भावना असेल तर मी स्वत:चं घरही पेटवू शकते, असं सांगत त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.
लोकसभेत शिवसेनेच्या काही खासदारांनी शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला. यावर राणा यांनी शिवसेनेवार टीका केली. महाराष्ट्रात जो ओला दुष्काळ पडला आहे, राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे याच्या मागे जर कोणाचा हात असेल तर तो शिवसेनेचा आहे. जर शेतकऱ्यांवर इतकं प्रेम आणि सहानूभुती आहे तर मग तिथे सरकार स्थापन करायचं होतं. शिवसेनेने स्वत:चा स्वार्थ आणि घराचा विचार केला. शेतकऱ्यांना मदत करण्याची भावना असेल तर मी स्वत:चं घरही पेटवू शकते. तसंच सरकार स्थापनेसाठी बहुमत मिळावं यासाठी समर्थनही देऊ शकते, असे त्या म्हणाल्या.
अनेक तालुक्यांमध्ये आपण फिरलो असून सोयाबीन, कापूस यांचं मोठं नुकसान झालं आहे. आज आमच्या राज्याला कोणीच माय-बाप नाही. केंद्रच आमचा माय-बाप आहे. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांसाठी ५० हजार कोटींची मदत जाहीर केली पाहिजे, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post