'देशात धर्माच्या नावावरून आणखी कोणता नवीन वाद निर्माण होणार नाही'


एएमसी मिरर : वेब न्यूज
रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. वादग्रस्त जागा हिंदुंना देण्यात येईल. तर मुस्लिमांना मशिदीसाठी वेगळी जमीन देण्यात येईल. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट केलं आहे. देशात धर्माच्या नावावरून आणखी कोणता नवीन वाद निर्माण होणार नाही अशी आशा आहे, असं त्यांनी ट्विट करत म्हटलंय.

ट्विटरवर नवाब मलिकांनी लिहिलं, ‘सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निकाल असेल तो आम्हाला मान्य असेल आणि सर्वांनी मान्य करावा, अशी आमची सुरुवातीपासूनच भूमिका राहिली आहे. देशात धर्माच्या नावावरून आणखी कोणता नवीन वाद निर्माण होणार नाही अशी आशा आहे.’

Post a Comment

Previous Post Next Post