महाविकास आघाडीचं सरकार येईल : नवाब मलिक


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार येईल हा आमचा विश्वास आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. वाय. बी. चव्हाण सेंटर या ठिकाणी शरद पवार यांनी राष्ट्रवादीची बैठक घेतली. या बैठकीला सुमारे ४० आमदारांची हजेरी होती. ५ आमदार आमच्या संपर्कात नाहीत आणि ६ आमदार हॉटेल रेनेसॉन्स या ठिकाणी पोहचत आहेत अशी माहिती नवाब मलिक यांनी या बैठकीनंतर दिली.
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार यांनी हे बंड केल्याची चर्चा काल दिवसभर रंगली होती. त्यानंतर एक एक आमदार पवारांकडे परतले. आता सगळे आमदार मुंबईतच राहणार आहेत. काही वेळापूर्वीच शरद पवार यांनीही वाय. बी. चव्हाण सेंटर सोडलं आहे. तर सगळे आमदार हॉटेलच्या दिशेने एका बसमधून रवाना झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असली, तरीही आम्ही त्यांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन हकालपट्टी केली आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. फ्लोअर टेस्टमध्ये हे सरकार टीकणार नाही,  आम्ही महाविकास आघाडीचंच सरकार स्थापन करु, असाही दावा मलिक यांनी केला. 

Post a Comment

Previous Post Next Post