आपल्याला शरद पवारांना साथ द्यायची आहे : जितेंद्र आव्हाड


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ६० वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील जातीयवाद्यांना रोखण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. शरद पवार जातीयवाद्यांना रोखून दाखवतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.
शरद पवारांनी टि्वटरद्वारे त्यांची भूमिका स्पष्ट केली. कुठल्याही परिस्थितीत ते भाजपाचे समर्थन करणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांशी द्रोह करणार नाहीत असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
कार्यकर्त्यांनी भावनाविवश होऊ नये. शरद पवार तुमच्या-माझ्या भावनेसोबत आहेत. सोशल मीडियावर तुमच्या भावनांचा उद्रेक होऊ देऊ नका. आपल्याला शरद पवारांना साथ द्यायची आहे असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post