शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : आ. संग्राम जगताप


एएमसी मिरर : नगर 
अतिवृष्टीमुळे शहरालगत असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशा सूचना आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
आमदार जगताप यांनी तहसीलदार उमेश पाटील यांची भेट घेउन चर्चा केली. पंचनामे करण्याच्या मागणीचे निवेदनही त्यांनी दिले आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे नगर शहरालगत असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांचे आंबे व पेरू या फळबागांचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक उभी पिकेही खराब झाली आहे. अवेळी आलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे ते प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहेत. या बळीराजाला या अडचणीतून बाहेर काढण्याच्या दृष्टीने शासनाकडून योग्य ते नियोजन व उपाययोजना करण्यात येतीलच. पण या शेतकऱ्यांना मदत मिळण्याच्या दृष्टीने आपल्याकडून त्यांच्या नुकसान भरपाईचे
पंचनामे होणेही आवश्यक आहे. याबाबत तत्काळ संबंधित यंत्रणेला नालेगांव, बोल्हेगांव, केडगांव व बुरुडगांव आदी परिसरातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे, अशा सूचना आमदार जगताप यांनी दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post