पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आलेला नाही : शरद पवार


एएमसी मिरर : वेब न्यूज
शिवसेना आणि भाजपातील कोंडी हे राजकीय नाट्य नसून ती गंभीर चर्चा आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळं त्यावर विचार केलेला नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
शरद पवार म्हणाले की, राज्यात जी स्थिती निर्माण झाली आहे. त्यासंदर्भात सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यांना राज्यातील सध्याच्या जे सुरू आहे, त्याची कल्पना दिली. यासंदर्भात पुन्हा त्यांच्याशी भेटणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लोकांनी विरोधी पक्षात बसण्यासाठी कौल दिला आहे. आमच्या सत्ता स्थापन करण्याइतकं संख्याबळ नाही. भाजपा-शिवसेनेनं लवकर सरकार स्थापन करावं, अस ते म्हणाले. नव्या समीकरणाविषयी पवार म्हणाले की, शिवसेना सातत्यानं मुख्यमंत्री पदाची मागणी करत आहे. भाजपावर टीकाही केली जात आहे. त्यामुळं त्यांच्यात जे सुरू आहे. ते नाट्य नाही. शिवसेना गंभीर आहे. त्यामुळं पुढे काय घडेल हे आताच सांगू शकत नाही. पाठिंब्यासाठी राष्ट्रवादीला अद्याप शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळं त्यावर विचार केलेला नाही. आणखी वाट पाहून, पुन्हा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. त्यानंतर पुढे काय करायचं ते ठरवू, असही शरद पवार यावेळी म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post