एखाद्या व्यक्तीचं मत वेगळं असू शकतं : शरद पवार


एएमसी मिरर वेब टीम 
सातारा : एखाद्या व्यक्तीचं मत वेगळं असू शकतं. हे मत पक्षाच्या बैठकीत मांडल्यानंतर त्यादृष्टीने वेगळी पाऊलं टाकली जाऊ शकतात. पण असे निर्णय व्यक्तिगत नसतात तर पक्षाचे असतात, असं सांगत अजित पवार यांचा निर्णय़ वैयक्तिक असून राष्ट्रवादी पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
शरद पवार यांनी साताऱ्यात प्रीतीसंगमावर यंशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बहुमत नसतानाही भाजपानं सरकार बनवलं. केंद्रातील सत्ता, राज्यपाल याचा गैरवापर करण्यात आला, असा  आरोप त्यांनी केला. पक्ष म्हणून राष्ट्रवादी सरकारमध्ये सामील नाही. हा पक्षाचा निर्णय नाही, त्याच्याशी आम्ही सहमत नाही, असं शरद पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. ही निवड वैध आहे की नाही हा खरा प्रश्न असून राज्यपालांनी सांगितलेल्या दिवशी मतदान झाल्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post