शिवसेनेसोबत चर्चा अंतिम टप्प्यात : शरद पवार


एएमसी मिरर : वेब न्यूज
शिवसेनेसोबत सरकार स्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी दिली आहे. याआधी सोमवारी पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याची कोणतीही चर्चा सुरु नसल्याचं सांगितल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेची कोंडी झाली होती. मात्र आता शरद पवार यांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापनेची चर्चा दोन ते तीन दिवसांत संपेल असं सांगत सकारात्मक संकेत दिले आहेत.
शरद पवारांनी सांगितलं आहे की, शिवसेनेसोबत सरकार स्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात असून दोन ते तीन दिवसांत संपेल. आज सामायिक कार्यक्रम निश्चित होईल”. दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत आज बैठक पार पडणार आहे. राज्यातील सत्तास्थापनेचा पेच मुंबईत सुटत नसल्याने आता सर्व राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू नवी दिल्लीकडे सरकला आहे. राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा दोन-तीन दिवसांत सुटेल, असा विश्वास काँग्रेस आघाडीच्या उच्चपदस्थांकडून व्यक्त करण्यात येत असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची संयुक्त बैठक दिल्लीत पार पडणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post