“नथुराम गोडसे आमच्या मनात”


एएमसी मिरर : वेब न्यूज
“नथुराम गोडसे आमच्या मनात वसतात” असं म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणती राज्यश्री चौधरी यांनी महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्या फोटोची पूजा केली. तसंच नथुराम गोडसेची आरतीही केली. या घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
राज्यश्री चौधरी या हिंदू महासभेच्या नेत्या आहेत. त्यांनी त्यांच्या काही समर्थकांसह महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुरामाच्या फोटोची आरती केली आणि पूजाही केली. एएनआयने दिलेल्या वृत्तात राज्यश्री चौधरी या नथुराम गोडसेच्या फोटोची पूजा करताना दिसत आहेत. तसंच इंडियन एक्स्प्रेसनेही या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये दौलतगंज भागात असलेल्या हिंदू महासभेचा कार्यालयात नथुराम गोडसे यांच्या प्रतिमेची चौधरी यांनी पूजा केली. जवाहरलाल नेहरु यांच्या सरकारमुळे गांधींजीची हत्या झाली, असा आरोप चौधरी यांनी केला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हिंदू महासभेविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश शनिवारी पोलिसांना दिले होते. राज्यात नथुराम गोडसेचं उदात्तीकरण मुळीच सहन केलं जाणार नाही असाही इशारा त्यांनी दिला होता.

Post a Comment

Previous Post Next Post