विकासाचा वेग कमी झालाय, पण देशात मंदी नाही : निर्मला सीतारमन


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : विकासाचा वेग कमी झालाय पण मंदीचा कुठलाही धोका नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन बुधवारी राज्यसभेत म्हणाल्या.
देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलत असताना त्यांनी, मोदींच्या पहिल्या टर्मची काँग्रेसप्रणीत संपुआ दोनच्या २००९ ते २०१४ मधील कारभाराबरोबर तुलना केली. मोदी सरकारच्या कार्यकाळात महागाई कमी आणि विकासाचा वेग जास्त असल्याचा सीतारमन यांनी दावा केला. २००९ ते १४ या काळात १८९.५ अब्ज डॉलर्सची परदेशी गुंतवणूक आली तेच भाजपाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात २८३.९ अब्ज डॉलर्सची परदेशी गुंतवणूक झाली, असे सीतारमन यांनी सांगितले.
सभागृहात सीतारमन यांनी ही विधाने केल्यानंतर काँग्रेसच्या सदस्यांनी वॉकआऊट केले. विरोधी पक्षांनीही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुद्दावरुन भाजपावर हल्लाबोल केला. देश मोठ्या संकटाच्या दिशेने चाललेला असून रोजचे खर्च भागवण्यासाठीही लोकांकडे पैसे नाहीत, असे विरोधकांचे म्हणणे होते.

Post a Comment

Previous Post Next Post