राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम; शिवसेनेची कोंडी


एएमसी मिरर : वेब न्यूज
राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. कारण शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला असला तरीही पाठिंब्याचं पत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिलं नाही त्यामुळे राज्यपालांनी यासाठीची वेळ वाढवून दिली नाही. त्यामुळे दावा जरी कायम असला तरीही शिवसेनेला दिलेली मुदत संपली आहे. शिवसेना दिलेल्या वेळेपर्यंत बहुमत सिद्ध करु शकलेली नाही. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. एकूणच सत्ता स्थापनेवरून शिवसेनेची कोंडी झाल्याचे चित्र आहे.
राज्यपालांकडे शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला होता. मात्र तसं काहीही घडू शकलेलं नाही. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला राज्यपाल सत्तास्थापनेसाठी बोलवू शकतात. शिवसेनेने केलेला सत्तास्थापनेचा दावा कायम आहे. मात्र शिवसेनेला दिलेली मुदत संपली आहे आणि ती मुदत वाढवून देण्यासाठी राज्यपालांनी नकार दिला आहे. त्यामुळे शिवसेनेची अभूतपूर्व कोंडी झाली आहे. आता राज्यपाल काय करणार? राष्ट्रपती राजवट लागू करणार की आघाडीला सत्ता स्थापनेसाठी पाचारण करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज्यपालांनी शिवसेनेचा दावा स्वीकारलेला असला तरीही तो स्वतंत्र दावा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post