१७ नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड : शरद पवार


एएमसी मिरर : वेब न्यूज 
१७ नोव्हेंबरला सरकार स्थापन होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र १७ नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. सरकार स्थापनेसाठी वेळ लागेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेटीदरम्यान चर्चेदरम्यान शरद पवार यांनी हे वक्तव्य केले. १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी असते. त्याच दिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल, असे संकेत दिले जात होते. मात्र, शरद पवार यांनी ही शक्यता नाकारली आहे. नितीन राऊत यांच्या घरी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत भाऊ लोखंडे हे उपस्थित होते. यावेळी १७ नोव्हेंबरला महाराष्ट्राचा इतिहास बदलून द्या, अशी इच्छा लोखंडे यांनी शरद पवारांकडे बोलून दाखवली. मात्र १७ तारखेला अवघड आहे, अजून भरपूर वेळ लागेल, असे उत्तर शरद पवार यांनी त्यांना दिले. 
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी आमची चर्चा काँग्रेस आणि शिवसेनेबाबत सुरु आहे. त्यामुळे या तीन पक्षांनी स्थापन केलेले सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार. तिन्ही पक्षांचे सरकार ५ वर्षे चालावे यावर आमची नजर असणारच आहे, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

Post a Comment

Previous Post Next Post