चोरीचा आरोप सहन न झाल्याने वृद्ध महिलेची आत्महत्या


एएमसी मिरर : वेब न्यूज
चोरीचा आरोप सहन न झाल्याच्या मनस्तापातून घरकाम करणाऱ्या ७० वर्षीय महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. छबाबाई नारायण पाचमासे असे मृत महिलेचे नाव असून घरमालकीण मंजुबाई पुजारी यांनी पोलिसात चोरीची तक्रार दिल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे.
परळी शहरातील स्नेहनगर भागात घरगुती धुणीभांडी करणाऱ्या ७० वर्षीय छबाबाई नारायण पाचमासे यांनी शुक्रवारी रात्री राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. छबाबाई ह्या दोन वर्षांपासून मंजुबाई गणेश पुजारी यांच्या घरी धुणीभांडी करण्याचे काम करत होत्या.
आठवडाभरापूर्वी त्यांचा हात मोडल्यामुळे त्या कामाला गेल्या नाहीत. कामाला येत नसल्याच्या कारणावरून मालकीण मंजुबाई यांनी त्यांना धमकावलेही होते. दरम्यान सोन्याचे दागिने चोरी केल्याचा आरोप करून पोलीस ठाण्यात छबुबाई यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली होती. चोरीच्या आरोपाचा मनस्ताप सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाइकांनी केला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post